नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तापी नदीवर प्रात्यक्षिके

नैसर्गिक आपत्ती सांगून येत नसते त्याच्यासाठी प्रशासनाला नेहमीच तयार राहावं लागतं. नैसर्गिक आपत्तीसाठी पूर्वतयारी करावी लागते. या पार्श्वभूमीवर आज भुसावळ प्रशासनाच्या वतीने तापी नदीवर प्रात्यक्षिके घेण्यात आली. यामध्ये काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते. नदीला जर पूर आला त्याच्यामध्ये मनुष्य हानी झाली तर त्यांना कसे वाचवता येईल याबाबत प्रशासनाच्या वतीने प्रात्यक्षिके घेण्यात आल. दरम्यान, अशा स्वयंसेवकांना शासनाकडून कोणतेही मानधन दिले जात नाही. परंतु, या स्वयंसेवकांना ओळख पत्र देण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली आहे.

First Published on: May 18, 2021 5:15 PM
Exit mobile version