सामाजिक संस्थांना हातभार लावण्यासाठी आम्र महोत्सव

संजय मोने आणि सुकन्या मोने मराठी चित्रपत्र सृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक नाव. मालिका, सिनेमा गाजवणाऱ्या या दाम्पत्याने आता सामजिक कार्यात देखील उडी घेतली आहे. म्हणून सामाजिक बांधिलकी जपत सुकन्या आणि संजय मोने यांनी मुंबईमध्ये आम्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवातून जमा झालेले पैसे ते ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना देणार आहेत. शिवाजी पार्क येथील वनिता समाज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात ३०० रुपयांमध्ये आमरस पुरी, बटाट्याची भाजी याचा भरपेट आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले आहे. नेमकी काय आहे ही संकल्पना याविषयी संजय मोने आणि सुकन्या मोने यांच्याशी बातचित केलीय आमच्या प्रतिनिधीने.

First Published on: May 18, 2019 4:25 PM
Exit mobile version