स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कागदाच्या टिकल्यापासून मोझेक पोर्टेट

विलेपार्ले येथील कलाकार नितिन कांबळे लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू शकत नाही, पण त्याने २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंती निमित्त मानवंदना देयचं ठरवलं होतं, पण बाहेर सगळी दुकाने बंद असताना पोर्ट्रेटसाठी लागणारे साहित्य मिळणार नसल्याने नितीनने घरीच एक मोठ्या कागदाला ५ रंगात रंगवून पंच मशीनच्या साहाय्याने ६९८४ हजार तुकडे कापून २४×१८ इंच मापाचे मोझेक पोर्ट्रेट तयार केले. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटल की, आठवत ते सूर्या प्रमाणे तळपणारे व्यक्तिमत्व aआणि प्रखर देशभक्त. ज्यांनी आपल्या आयुष्याची ८३ वर्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी बहाल केली. ११ वर्षांची अंदमानची शिक्षा  त्यानंतर अडीच वर्ष रत्नागिरीची काळकोठडी असे साडे १३ वर्षानंतर रत्नागिरीच्या घरात आले. तेव्हा त्यांनी सहा हजार ओव्या आठवल्या आणि कागदावर लिहून काढल्या अशाप्रकारे कमला महाकाव्य जगासमोर आले. असे आपले भारतरत्न स्वातंत्रवीर सावरकर. आणि आपण लॉकडाऊनमध्ये हे नाही ते नाही. म्हणून हताश होऊन बसतो, तरूणाईने सावरकरांकडून स्फूर्ती घेतली पाहिजे.

First Published on: May 27, 2020 4:40 PM
Exit mobile version