पंतप्रधान मोदींच्या प्रचारामुळे डॉ. अमोल कोल्हेंच्या सभा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात प्रचार सभा होत आहे. प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आल्याने आजच्या प्रचार सभांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. देशाचे पंतप्रधान जर एका पक्षाच्या प्रचारासाठी येत असतील तर त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवणं कितपत योग्य आहे? हे किती लोकशाहीच्या मुल्यांना धरून आहे, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: October 17, 2019 7:49 PM
Exit mobile version