मुंबई महापौर किशोरी पेडणेकरही झाल्या क्वारंटाइन

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहण्यासाठी महापौर अनेक हॉस्पिटल, आरोग्य केंद्र, क्वारंटाइन सेंटर्समध्ये फिरल्या आहेत. त्यानंतर केलेल्या कोरोना चाचणीत महापौरांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी खबरदारीच्या दृष्टीकोनातून त्यांनी १४ दिवस महापौर निवासस्थानीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: April 20, 2020 6:52 PM
Exit mobile version