APMC मार्केट बंद, माथाडी कामगारांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन

राज्यात आजवर आलेल्या सर्व सरकारांना माथाडी कामगारांचे प्रश्न माहीत आहेत. मात्र, तरी ते प्रश्न सोडवेल गेले नाहीत. त्यामुळे माथाडी कामगारांच्या या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज माथाडी कामगारांनी एपीएमसी बंदची हाक दिली. एपीएमसी मधील पाचही बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी आज संप पुकारला आहे. या संपात मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा बाजार समित्याही या संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळं आज बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र, मोठी गैरसोय होताना दिसत आहे.

First Published on: December 14, 2020 1:37 PM
Exit mobile version