प्रवाशांना वाचवणार्‍या त्या आरपीएफ जवानांना शौर्य पुरस्कार

महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्या वर्षी मुसळधार पावसात वांगणी – बदलापूर दरम्यान अडकली आणि प्रवासी 17 तासाहून अधिक वेळ गाडीमध्ये अडकूण पडले होते. अशा संकटकाळात आरपीएफ ट्रेन एस्कॉर्टींग पार्टीने सतत परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आणि नियंत्रण कक्ष व उच्च अधिकार्‍यांशी संवाद साधला जेणेकरुन एनडीआरएफ, नेव्ही, अग्निशमन दलाच्या बचाव पथकाच्या गरजेबाबत वेळेवर निर्णय घेता आला. तसेच महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेनमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी जीवाची बाजी लावून महत्वपूर्ण योगदान देणार्‍या मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोस्ट एलटीटीचे हेड कॉन्स्टेबल एस.पी.ठाकुर, कॉन्स्टेबल शरद घरते, कॉन्स्टेबल राहुल कुमार आणि कॉन्स्टेबल जितेंद्र यादव यांना प्रतिष्ठित अशा महासंचालक सन्मान चिन्हाने गौरविण्यात येणार आहे.

First Published on: November 30, 2020 9:20 PM
Exit mobile version