१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून मुंबईकरांची लाईफ लाईन बंद झाली होती. पण टप्प्याटप्प्याने लोकल सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा दिली. त्यानंतर सर्वसामान्य महिलांसाठी लोकल प्रवास सुरू करण्यात आला. आता १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या निर्णयावर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

First Published on: January 29, 2021 6:08 PM
Exit mobile version