मुंबईत ढगाळ वातावरण, काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी

मुंबईत आज सकाळीपासून ढगाळ वातावरण पहायला मिळात आहे. आज सकाळीच मुंबईतील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत मागील १ तासापासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. त्याचप्रमाणे सायन, चेंबूर, कुर्ला,परेल,माहिम, दादर परिसरात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन हिवाळ्यात सकाळीच तुरळक पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.

First Published on: December 1, 2021 12:44 PM
Exit mobile version