अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई सपकाळ यांचे पार्थिव सकाळी 9 ते 11 पर्यंत अंत्यदर्शनासाठी पुण्यातील मांजरीच्या बाल सदन संस्थेत ठेवण्यात आलं असून नवी पेठेतील ठोसर पागेल महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार 12 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं

First Published on: January 5, 2022 1:13 PM
Exit mobile version