भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा

देशातील कोरोना विरोधातील लसीकरण मोहीमेत महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत १५० कोटी डोस देण्यात आले आहेत. सुरुवातीला धीम्या गतीने सुरू झालेल्या देशातील लसीकरण मोहीम ऑगस्ट २०२१ पासून वेगाने सुरू झाली. सप्टेंबर महिन्यात लसीकरण मोहीमेसाठी चांगला होता. या महिन्यात तब्बल २४ कोटी डोस लोकांना देण्यात आले. १ डिसेंबरपासून दररोज ६८ लाख लोकांना लस दिली जात आहे.

First Published on: January 8, 2022 11:55 AM
Exit mobile version