नाना पटोलेंविरोधात नाशिक, भंडारा, नागपूरमध्ये भाजपकडून तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त विधान केल्या प्रकरणात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाना पटोले यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये नाना पटोले हे मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे वक्तव्य करताना दिसत आहे. याच प्रकरणात गुन्हा दाखल करत नाना पटोलेंविरोधात सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

First Published on: January 18, 2022 1:07 PM
Exit mobile version