नवाब मलिकांच्या जावयाशी संबंधित दोघांना एनसीबी एसआयटीचा समन्स

एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या ड्रग्ज कारवाईवर नवाब मलिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मलिकांचा जावई नुकताच तुरुंगातून बाहेर आला आहे. परंतु एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटी चौकशीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांचा जावई समीर खानच्या संबंधित दोघांची चौकशी करण्यासाठी एसआयटीने समन्स जारी केले आहेत.

First Published on: November 9, 2021 12:29 PM
Exit mobile version