मंदिरे खुली, आनंदात रहा पण कोरोनाचे नियम पाळा – मुख्यमंत्री

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबईच्या मुंबा देवीचे दर्शन घेत भाविकांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आनंदात राहा पण कोरोनाचे नियम पाळा असे आवाहन देखील केले आहे.

First Published on: October 7, 2021 1:28 PM
Exit mobile version