मोदींसाठी कल्याणचे रस्ते चकाचक

कल्याण – मेट्रो रेल्वे प्रकल्प व पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे भूमिपूजन करण्यासाठी १८ डिसेंबरला कल्याण दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्यामुळे अधिकारी आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळत आहे. मोदींचा ताफा ज्या रस्त्याने येणार आहे, तसेच मोदींचा हा कार्यक्रम ज्या फडके मैदानात होणार आहे, तेथील रस्ते चकाचक करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. एरव्ही कल्याण येथील रस्त्यावरील खड्ड्याची दखल न घेणारे पालिका प्रशासनाचे अधिकारी आता चक्क स्वतः लक्ष देत खड्डे डांबरीकरण करून ते बुजवून घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
First Published on: December 16, 2018 6:34 PM
Exit mobile version