उंदारांवर करण्यात आलेली नेजल वॅक्सिन ठरली यशस्वीही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यात भारताला यश आले आहे. मात्र, असे असले तरी आता देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात लसीकरण मोहिम वाढवण्यात आली आहे. यामुळे सर्वाधिक नागरिक लसीकरणातून स्वत:ला सुरक्षित करत आहेत. यातच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेजल वॅक्सिन स्प्रे संदर्भात भाष्य केले. नेजल स्प्रे वॅक्सिनवर रिसर्च सुरु असून जर हा रिसर्च यशस्वी झाला तर देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु राहण्यास मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले. मात्र, ही नेजल स्प्रे वॅक्सिन नेमकी आहे कशी? आणि ती इतर वॅक्सिनपेक्षा का वेगळी आहे? जाणून घेऊया.

First Published on: June 8, 2021 4:06 PM
Exit mobile version