पूरग्रस्त भागातील स्थिती पाहून मुख्यमंत्र्यांवर संतापल्या नवनीत राणा

राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. यात शेतकरी पूर्णपणे बरबाद झालाय. मराठवाडासह विदर्भात पावसामुळे सोयाबीनसह कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर येत नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जावं आणि शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घ्यावी. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली. तसेच, शेतकऱ्यांना मदत न दिल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला.

First Published on: September 29, 2021 6:01 PM
Exit mobile version