इंडियन मॉडेलवर बोट ठेवण्याची संधी भाजप देतंय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारच्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावरील इंडियन मॉडेलचा चांगलाच समाचार घेतला आहे. देशात नदीमध्ये मृतदेह टाकणे, ऑषधे ऑक्सिजनचा तुटवडा, देशात लसींचे तुटवडा असताना बाहेरच्या देशांना लस पाठविणे हा इंडियन मॉडेल कोण स्वीकारणार नाही असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तर इंडियन मॉडेल झालेच पाहिजे परंतु हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजप निर्माण करुन देत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

First Published on: May 23, 2021 6:24 PM
Exit mobile version