केंद्र सरकारविरोधात सांगलीत तीव्र आंदोलने

पेट्रोलच्या किंमती झपाट्याने वाढून पेट्रोलचे दर आता शंभरी पार गेले आहेत. तसेच केंद्र सरकारने शेतकरी बांधवांच्या खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढवल्या आहेत. खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजप सरकारने केले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून राज्यभरात आंदोलन घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, आज सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

First Published on: May 18, 2021 6:18 PM
Exit mobile version