नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्काराचं सावट

देशाच्या संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आता यावरून कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे आणि इथूनच वादाची ठिणगी पडली. संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होत नसल्याने, तृणमूल काँग्रेस, आप, आरजेडी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासह जवळजवळ 19 पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.

First Published on: May 24, 2023 4:37 PM
Exit mobile version