पश्चिम रेल्वेवर आता उत्तम लोकल धावणार

पश्चिम रेल्वेवर मंगळवारपासून महिला प्रवाशांसाठी ‘उत्तम’ रेक असणारी लोकल चर्चगेट ते विरार मार्गावर धावली. पश्चिम रेल्वेवर या लोकलचे नियमित १० फेऱ्या होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या ६९ व्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी प्रायोगिक तत्वावर चर्चगेट ते विरार मार्गावर उत्तम रेक असणारी महिला विशेष लोकल धावली. ही लोकल चर्चगेटहुन संध्याकाळी ६.१५ वाजता सुटून विरारला रात्री ७.५७ वाजता पोहचते.

First Published on: November 6, 2019 9:12 PM
Exit mobile version