न्युझीलंडच्या पंतप्रधानांनी घालून दिला नवा आदर्श |

कोरोनाचा वाढता कहर पाहता प्रत्येक देशाने लसीकरणासह कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक निर्बंध व अटी लागू केल्या आहेत. दरम्यान हे सर्व नियम प्रत्येकाला पाळणे बंधनकारक आहे अशी मागणी वेळोवेळी सरकार कडून करण्यात येते. सध्या न्युझीलंडमध्येही कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाहीये. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डन यांनी कडक निर्बंध लागू केले असून या नियमाचे त्यांनी स्वत: देखील अगदी काटेकोरपणे पालन करत स्वत:चे लग्न रद्द केलं आहे.

First Published on: January 23, 2022 5:44 PM
Exit mobile version