आता गाडीची मालकी बदलणे होणार सुलभ

बँकांतील खात्यांवर आपण ज्या प्रमाणे नॉमिनी (वारसदार) नेमतो. तशी सुविधा आता दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसाठीही देण्यात आली आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने यासाठी मोटार वाहन कायद्यामध्ये आवश्यक बदल केले आहेत. या बदलांमुळे गाडी मालकाच्या मृत्यूनंतर संबंधित गाडीची मालकी बदलणे किंवा ती विकण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. सोबतच देशभरात ही प्रक्रिया एकसारखीच राहणार आहे.

First Published on: May 3, 2021 5:15 PM
Exit mobile version