राज ठाकरेंनी स्वतः चालवली लँड रोवर डीफेंडर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक मनसेकडून राज ठाकरेंना गणेश विसर्जन/ अनंत चतुर्थदशीच्या निमित्ताने जॅगवार लँड रोवर गाडी भेट दिली आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान ही गाडी स्वतः चालवत मनसे शाखांचे उद्घाटन केलं आहे. राज ठाकरेंना भेट दिलेल्या गाडीची किंमत सव्वा कोटींच्या आसपास आहे. नाशिकमध्ये राज ठाकरे शाखाध्यक्षांचा मेळावा घेणार आहे. महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसे अलर्ट मोडवर असून जोरदार तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपुर्वीच मनसे नेते अमित ठाकरेसुद्धा नाशिक दौरा करुन आले आहे. राज ठाकरेंनी पुण्याच्या दौऱ्यानंतर मोर्चा नाशिकडे वळवला आहे.

First Published on: September 23, 2021 12:23 PM
Exit mobile version