एकच मिशन जुनी पेन्शन

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीला घेऊन गोंदियात राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांचा गेल्या चार दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच विभागांतील सुमारे 25 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. तर जून्या पेंन्शन योजनेसाठी राज्य सरकारच्या सरकारनेच काढलेल्या शासकिय परीपत्रकाची गोंदिया जिल्हाच्या देवरी तालुक्यात होळी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

First Published on: March 18, 2023 1:49 PM
Exit mobile version