ओमिक्रॉन व्हेरियंटचं जगभरात थैमान

मागील दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. मात्र कोरोनाचा धोका दिवसागणिक कमी होत असतानाच दुसरीकडे ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटनं आता धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. कोविड-१९ चा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेपासून ते थेट भारतापर्यंत ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केलेला आहे. मात्र, धक्कादायक म्हणजे ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुद्दा यासंदर्भात माहिती दिली आहे.

First Published on: December 14, 2021 8:02 PM
Exit mobile version