कोल्हापुरात मूक मोर्चा तर सोलापुरात मात्र उग्र मोर्चा होणार

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापुरमधील पत्रकार परिषदेत सोलापुरात 4 जुलैला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा निघणार अशी माहिती दिली आहे. तसेच मोर्चासाठी छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह नारायण राणे यांना देखील निमंत्रित करणार.कोल्हापुरात मूक मोर्चा झालेला असला तरी सोलापुरात मात्र उग्र मोर्चा होणार.मोर्चाच्या तयारीसाठी नरेंद्र पाटील स्वतः सोलापूर जिल्ह्यात 5 दिवसांचा दौरा करणार आहेत.

First Published on: June 20, 2021 7:19 PM
Exit mobile version