कोरोनामुळे देशात बालगुन्हेगारी वाढली

बालगुन्हेगार म्हटले की सामान्यपणे झोपडपट्टीतील टवाळक्या करणारा, प्लॅटफॉर्मवर मुलांबरोबर फिरणारा गरीब घरातील मुलगा डोळ्यासमोर येतो. कधी पोटाची भूक शमवण्यासाठी , कधी मित्रांसह मज्जा मस्ती करण्यासाठी तर कधी घरांतील हालाखीच्या परिस्थितीमुळे ही लहान मुलं गुन्हेगारी विश्वाकडे वळतायतय. मात्र गुन्हेगारीचे हे विश्व केवळ गरीबांच्या झोपडीपुरतेच मर्यादित नाही तर मध्यमवर्गीयांच्या प्लॅट, श्रीमंतांच्या बंगल्यांपर्यंत पोहचलेले आहे. त्यामुळे भारतात बालगुन्हेगारी ही गंभीर समस्या बनत आहे. चाईल्ड राईट अँड यूच्या आकडेवारीनुसार, देशात दररोज सुमारे ३५० मुले ही कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांचे शिकार होत असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच भारतात बालगुन्हेगारी का वाढतेय आणि आत्तापर्यंत किती मुलं या गुन्हेगारी विश्वाकडे वळली आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ या..

First Published on: October 7, 2021 5:25 PM
Exit mobile version