रुग्णांचा ‘श्वास’वाढवण्यासाठी मोलाची मदत

बारामतीतील आरोग्य रुग्णालयामध्ये कोरोना रूग्णांबाबत ऑक्सिजनचा वापर कमी करून रुग्णांची ऑक्सिजनची मात्रा वाढवण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या काळात केलेल्या या अभिनव प्रयोगामुळे कोरोना रुग्णांचा ‘श्वास’ वाढवण्यासाठी मोलाची मदत होत आहे. दरम्यान, शस्त्रक्रियेवेळी भूलशास्त्रात रुग्णांना भूल देण्याकरिता ‘बेन सर्किट’चा वापर केला जातो. या बेन सर्किटमुळे ऑक्सिजनची लेव्हल वाढण्यास मदत होत आहे. केवळ दीड ते दोन हजार रुपये किमतीच्या या उपकरणाने ऐन संकटाच्या काळात कोरोना रुग्णांना दिलासा मिळू शकतो. हे या प्रयोगाने दाखवून दिले आहे.

First Published on: May 2, 2021 1:47 PM
Exit mobile version