स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निमित्त मुंडे बहीण भाऊ आमने-सामने

नगर पंचायत निवडणूकीच्या निमित्ताने परळीतील बहीण भाऊ अर्थात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकले आहेत. येत्या 21 डिसेंबर रोजी नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आणि याचीच रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात. याच पार्श्वभूमीवर भाऊ धनंजय मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे या दोघांमध्ये सामना रंगला आहे. पाच वर्ष सत्तेत असताना तुम्ही ऊसतोड महामंडळासाठी काय केलं? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय. तर दुसरीकडे आष्टी येथे झालेल्या सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकरी नुकसान भरपाई आणि पीक विम्यापासून वंचित असल्याचं म्हणत विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.

First Published on: December 19, 2021 3:29 PM
Exit mobile version