पोपटाची पोळी खाण्यासाठी धडपड

लॉकडाऊनमुळे सध्या सगळंच ठप्प झाल आहे. जो तो घरात आहे. पण याकाळात निसर्गाने मात्र कमाल केली आहे. माणसांचा वावरच नसल्याने प्राणी, पक्षी आता जंगल व बागा सोडून जमिनीवर व मानवी वस्त्यांमध्ये बिनधास्त फेरफटका मारताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यात किचनच्या खिडकीवर एक पोपट बसलेला दिसत आहे. पण या पोपटाची नजर मात्र किचनमध्ये बनणाऱ्या गरमागरम चपातीवर आहे. चपाती बनवणाऱ्या महिलेने दिलेला चपातीचा तुकडा एका पायात पकडत पोपट त्यावर मनसोक्त ताव मारतानाचा हा व्हिडीओ गंमतीशीर असून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हास्याची लकेर आणत आहे.

First Published on: April 11, 2020 6:03 PM
Exit mobile version