प्रतिदिन तयार होणार ३० हजार रेमडेसिवीर

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकार सर्वच स्तरावर इजेक्शनचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. तर आता एक दिलासादायक बाब म्हणजे आता वर्ध्यातील ‘जेनेटेक लाईफ सायन्सेस’ला ३० हजार वायल (कुपी) प्रतिदिन रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रेमडेसिवीर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती.

First Published on: April 20, 2021 10:37 AM
Exit mobile version