पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा जनतेला इशारा

लॉकडाऊनच्या काळात लोकांचा संपूर्ण वेळ घरातच जात असून त्यामुळे महिलांवर मात्र कामाचा प्रचंड ताण येत आहे. शिवाय घरामध्ये छोटी-मोठी भांडणही होत आहेत. अशावेळी महिलांवर अत्याचार किंवा हिंसाचाराचे प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. मात्र नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचारा समाजात अजिबात थारा नसल्याचे दाखवून दिले. महिलांवर हिंसाचार होत असेल, तर पोलीस प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेईल, असेही पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

 

First Published on: May 9, 2020 11:28 AM
Exit mobile version