नेत्यांच्या राजकारणामुळे कोकणची आरोग्य व्यवस्था ICU मध्ये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात कोविड १९ लॅबसाठी १ कोटी ७ लाख रुपयांचा निधी दिला. कोकणातील कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासण्या या कोकणातच व्हाव्यात अशी यामागची भावना आहे. लॅबचा विचार जरी चांगला असला तरी प्रत्यक्षात लॅबसाठी कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. पण नोकरभरती आजच्या परिस्थितीत शक्य नाही. त्यामुळे लॅब उभी राहू शकेल की नाही? अशी परिस्थिती आहे. हेच जर राणे किंवा वालावलकर यांच्या रुग्णालयात ही लॅब होऊ शकली नसती का? असा प्रश्न निर्माण होत आहे. राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण बाजुला सारून कोकणातील जनतेचा विचार करायला हवा.

First Published on: May 24, 2020 5:42 PM
Exit mobile version