राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन मंत्री ईडीच्या रडारवर

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास १३ कोटी ४१ लाख इतकी आहे. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनीही जप्त केल्या आहेत. त्या जागांची किंमत जवळपास ७ कोटी ६० लाख इतकी आहे. त्यामुळे अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री ईडीच्या निशाण्यावर असल्याचं समोर आलं आहे.

First Published on: March 1, 2022 9:08 PM
Exit mobile version