प्राजक्ता माळी घेऊन आली आहे,“प्राजक्तराज”

आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात करत असून ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे.

First Published on: January 8, 2023 11:00 AM
Exit mobile version