प्रकाश आंबेडकर यांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान, शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये डिझेल व पेट्रोलचे भाव उतरले असताना भारत देशात मात्र त्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. हे सरकार म्हणजे संघटित गुन्हेगारांचे सरकार आहे. खडखडाट असलेली तिजोरी भरण्यासाठी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले जात आहेत, असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

First Published on: June 25, 2020 8:38 PM
Exit mobile version