प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे शिवशक्ती-भीमशक्ती युतीत गोंधळ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यात येणार का? असा प्रश्न असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपासोबत असल्याचे वक्तव्य आंबेडकर यांनी केलंय. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना जपून बोलण्याचा सल्ला दिला. यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्तीमध्ये मतमतांतर पाहायला मिळत आहे.

First Published on: January 27, 2023 2:41 PM
Exit mobile version