घरातील भांडीकुंडी विकून सरकार चालत नाही

केंद्र सरकारने ज्या पद्धतीने कारभार करायला हवा, त्या पद्धतीने केला जात नाही. लोकांना भयभीत करुन सरकार चालवले जात आहे. सरकार चालविण्यासाठी १३ लाख कोटी लागतात मात्र अद्याप ११ लाख कोटी उत्पन्न गोळा झाले आहे. उरलेले उत्पन्न कुठून आणणार? हा प्रश्न उरतोय. NRC, CAA मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबाबत संभ्रम आहे, त्यामुळे आपल्याला कर्ज मिळणार नाही. एखादा दारू पिणारा माणूस दारूसाठी घरातली भांडीकुंडी विकतो. त्याप्रमाणे केंद्र सरकार घरातील वस्तू विकायला निघाले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

First Published on: January 9, 2020 9:06 PM
Exit mobile version