नाट्यगृह सुधारण्यावर प्रशांत दामलेंचे सूचक वक्तव्य

अभिनेता प्रशांत दामले यांनी कल्याण डोंबिवलीमधील नाट्यगृहांच्या स्थितीवरून नाराजी व्यक्त केली आहे. येथील दोन नाट्यगृहांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. या नाट्यगृहांबाबत प्रशांत दामले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली नसली तरी सूचक वक्तव्य केलं आहे. कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृह आणि डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हे दोन्ही नाट्यगृह तितकी वाईट नाही, पण तितकी छानही नाहीत, असं वक्तव्य प्रशांत दामले यांनी केलं आहे.

First Published on: October 30, 2022 3:35 PM
Exit mobile version