राजकीयदृष्ट्या आलेल्या बेरोजगारीची काँग्रेसने चिंता करावी – दरेकर

काँग्रेसच्या महागाईविरोधातील आंदोलनावर सत्ताधारी भाजपकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. देशात आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतु आंदोलनातून नौटंकी करण्यापेक्षा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला सूचना द्याव्यात, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. काँग्रेसनं महागाईविरोधात राज्यासह देशात आंदोलन करत आहेत. या आंदोलनात प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यातसुद्धा घेतलं आहे.

First Published on: August 5, 2022 1:18 PM
Exit mobile version