कोकणकन्या बनली कोकण रेल्वेची मोटर वूमन

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोकणवासियांना अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साळवे गावच्या प्रिया बाबुराव तेटगुरे कोकण रेल्वेची चालक बनली आहे. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रियाचे वडील माणगांव रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्क म्हणून काम करत आहेत. रत्नागिरीतून इंजिनियरींगचे शिक्षण घेतलेल्या प्रियाने आपल्या कुटुंबाला अभिमान वाटेल, असे काम केले आहे.
First Published on: March 8, 2020 6:09 PM
Exit mobile version