राजकीय कार्यक्रमाच्या वेळी कोरोना नसतो का? अभाविपचा सवाल

लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० पुढे ढकलण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक गुरुवारी जारी केले. दरम्यान, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. अखेर दिवसभराच्या गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत याच आठवड्यात परीक्षा होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी लोकसेवा आयोगाने सुधारित प्रसिद्धी पत्रक जारी करत येत्या २१ मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार असल्याचे जारी केले. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यक्रमाच्या वेळी कोरोना नसतो का?, असा सवाल उपस्थित करत दादरमध्ये निदर्शनं केली.

First Published on: March 12, 2021 2:06 PM
Exit mobile version