शेतीच्या मशागतीची काम खोळंबली

सध्या रब्बी पेरणीच्या हंगामासाठी जिल्ह्यामध्ये शेतकरी शेतीची मशागतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. परंतु, आज जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने तब्बल एक तास हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यापासून दिलासा मिळाला. मात्र, शेतीच्या मशागतीची काम खोळंबली. या अवकाळी झालेल्या पावसामुळे किमान एक आठवडा तरी शेतीमधील ओलावा दूर होणार नाही. त्यामुळे एका आठवड्यानंतर शेतीच्या मशागतीला सुरुवात करता येईल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

First Published on: May 16, 2021 12:45 PM
Exit mobile version