राज ठाकरेंनी घेतले नीलकंठ खाडिलकर यांचे अंत्यदर्शन

दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नवाकाळ कार्यालयात ठेवण्यात आले होते. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. नीळकंठ खाडिलकर नवाकाळचे अनेक वर्ष संपादक होते. या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केलं. वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू आणि विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं.

First Published on: November 22, 2019 2:05 PM
Exit mobile version