काही दिवसांत महाराष्ट्रात शंभर टक्के ‘Vaccination’ होणार – Rajesh Tope

ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालनामधील पत्रकार परिषदेत दिली आहे. ओमिक्रॉन हा संसर्गजन्य असला तरी, तो धोकादायक नसल्याचे टोपे यांनी म्हंटले आहे.सध्या राज्यात ओमिक्रॉनचे ५४ रुग्ण असून, प्रोटोकॉलनुसार, दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे,अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.त्याचबरोबर राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून, येत्या पंधरा ते वीस दिवसांत महाराष्ट्र शंभर टक्के लसीकरण होईल असेही टोपे यांनी म्हंटले आहे .

First Published on: December 21, 2021 3:23 PM
Exit mobile version