खेळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात शिवाजी घडले

राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळातून शिक्षण दिल्यानेच शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडतानाच, राष्ट्रनायक झाले. आपण महाराष्ट्रातच आहोत, ज्याठिकाणी एका खेळाने एका मुलाला राष्ट्रनायक म्हणून घडवले, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात फक्त राजमाता जिजाऊ यांचेच योगदान आहे. त्यांच्या घडवणुकीत समर्थ रामदास किंवा दादोजी कोंडदेव यांचा सहभाग नाही, असा दावा संघटनांचा आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा या वादाची ठिणगी पडली आहे.

First Published on: August 28, 2021 1:58 PM
Exit mobile version