पुढील सुनावणी 15 जूनला, वकील प्रदीप घरत यांची प्रतिक्रिया

राणा दाम्पत्याला जमीन देताना कोर्टाने तीन अटी घातल्या होत्या. मात्र यातील एका अटीचं राणा दाम्पत्यानी उल्लंघन केलं असल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंबंधित आज कोर्टात सुनावणी होती. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी अधिकचा वेळ देण्याची विनंती कोर्टाला केली. ती मान्य करत कोर्टाने सुनावणी जवळपास 1 महिना पुढे ढकलली आहे. पुढील सुनावणी 15 जून रोजी होणार आहे.या प्रकरणा संदर्भात विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: May 18, 2022 1:04 PM
Exit mobile version