उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिल्यास त्यांचे स्वागत – रावसाहेब दानवे

शिवसेनेतील १२ पेक्षा अधिक खासदार हे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहेत. शिंदे गटात हे खासदार जाणार आहेत. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करू. आगामी निवडणुकींसाठी भाजप आणि शिंदे गटात चर्चा करून त्यांना निवडणुकीमध्ये सहभागी करू, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

First Published on: July 11, 2022 9:26 PM
Exit mobile version