गांधीजींचा खरा इतिहास बघण्याचा चष्मा!

गांधी कधी मरत नाही, तो विचार आहे. हा विचार माझ्या देशात नाही तर तो जगाच्या अंतापर्यंत टिकून राहणार आहे, हे जेव्हा लख्खपणे समोर येते तेव्हा एक भारतीय असल्याचा अभिमान ओसंडून वाहतो… सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांचे ‘गांधी का मरत नाही’ हे पुस्तक वाचताना हा अनुभव पुन्हा एकदा आपल्याला समृद्ध करतो. या पुस्तकाच्या निमित्ताने तरी मोठ्या जनमानसाला जो काही गांधींचा खोटा इतिहास काल, आज आणि उद्या सुद्धा सांगितला जाईल, तो कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी हे पुस्तक मोलाचे ठरणार आहे.

First Published on: January 17, 2021 12:05 PM
Exit mobile version